सी.बी.एस.ई.बोर्ड (AISSE) 10 वी च्या परीक्षेत रोटरी इंग्लिश स्कूलची उच्च निकालाची पारंपरा कायम

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल या शाळेच्या इ. 10 वी CBSE (AISSE) च्या राष्ट्रीय स्तराच्या अभ्यासक्रमात सातव्या बॅचचा वार्षिक परीक्षेचा निकाल बुधवार दि. 15 जुलै 2020 रोजी जाहीर झाला.शाळेचा निकाल 100% लागला असून शाळेने आपली नऊ वर्षापासूनची उच्च निकालाच्या यशाची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले. 39 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. शाळेचे 33 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.
शाळेच्या विद्यार्थिनी कु. सलोनी अनिलकुमार पुरसवानी व कु. तानिया महेश वालेचा या दोघी 97.60% गुण मिळवून प्रथम आल्या तर कु.दिव्या महेंद्र इंदाणी ही 97.40% गुण मिळवून द्वितीय आली व कु. तन्वी सचिन शाह ही 96.60% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. याशिवाय कु. संजना पुरसवानी, तुषार बदलानी, सम्यक जैन, कु. यशस्वी कुवर, कु. प्रियंका ठाकरे, प्रथम पुरसवानी, हर्ष जैन, मंगेश पवार यांनी सुद्धा 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले.
एकूण 12 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले. 14 विद्यार्थ्यांनी 80 ते 90 % गुण प्राप्त केले, तर 7 विद्यार्थ्यांनी 70 ते 80%, 4 विद्यार्थ्यांनी गुण 60 ते 70% गुण, तर 2 विद्यार्थ्यांनी 50 ते 60% गुण प्राप्त केले. या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवून शाळेची व स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, शाळेचा शिक्षक वर्ग, प्रशासन व संचालक व पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून, यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here