जळगाव (निलेश पाटील) – एरंडोल कोविड सेंटरला अतिरिक्त पाच ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी स्वराज्य फाउंडेशन मित्र परिवार यांच्या तर्फे आज रोख रक्कम रुपये 71000 (एक्कात्तर हजार)मदत करण्यात आली.
सदर मदत एरंडोल प्रांतअधिकारी श्री विनय गोसावी साहेब यांच्या स्वाधीन करताना स्वराज्य फॉउंडेशन मित्र परिवाराचे पदाधिकारी प्रा.मनोज पाटील, तुषार अँग्रो सेल्स चे संचालक तुषार मोने, जय बजरंग ट्रेडर्सचे संचालक महेंद्र चौधरी, अरिहंत मोबाईल्स चे संचालक सचिन जैन, ठाकूर कलेक्शन चे संचालक दिपेश ठाकूर, मे.दगडूसेठ देवरे ज्वेलर्सचे संचालक महेशभाऊ देवरे, चंद्रकांत पारखे, राहुल शिंपी(सर), गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर सुनील पांडुरंग चौधरी, श्रद्धा फोटोचे संचालक नितीन महाजन, पांडव ट्रेडर्सचे संचालक दिपक चौधरी, पिंटू राजपूत पत्रकार, राम ठाकूर, अमोल जाधव, सुनील तायडे, विवेक पाटील प.स.सदस्य, बाजीराव पांढरे, अशोक दादा भवार या सर्व मित्र परिवाराने एरंडोल प्रांताधिकारी श्री. गोसावी यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत व एरंडोल कोविड सेंटर मधून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशंट जळगांव पाठवावे लागत असल्याने त्याची खरी गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी रोख रक्कम रुपये 71000/- (एक्काहत्तर हजार) रुपयाची मदत करण्यासाठी सर्व मित्र परिवार एकत्र येऊन ही मदत करण्याचे ठरवले आणि आज ही मदत विनय गोसावी साहेब यांच्या हातात प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन सुपूर्द केली. सदर ऑक्सिजन बेडसाठी आमदार निधीतून सुद्धा 20 बेडचे काम सुरू आहे. अतिरिक्त 5 ऑक्सिजन बेड ची तयार करणेकामी सदर मदत ही स्वराज्य फॉउंडेशन तर्फे करण्यात आली.







