महाशिवरात्रीला नारंगी हद्दीतील भुवनेश्वर मंदीर बंद राहणार

अलिबाग-सोगावकर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील नारंगी हद्दीतील श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदीर महाशिवरात्री 11 मार्च रोजी बंद राहाणार असल्याने त्यादिवशी मंदीर परिसरात भरणारी महाशिवरात्रीची यात्राही रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीपक पाटील आणि सचिव उल्हास म्हात्रे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 144 कलम जारी केल्याने तसेच महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिरात होणारी मोठी गर्दी आणि यात्रेला उशिरापर्यंत होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी भुवनेश्वर मंदीर ट्रस्ट १८ गाव समिती,  चिंचवलीच्या  (नारंगी) पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, याची नोंद भाविकांसह विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्यांनी घ्यावी असे आवाहनही देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here