राखी सावंतच्या ‘नागिन’ अवताराचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – राखी सावंत काही ना कोणत्या कारणाने दररोज चर्चेत असते. बिग बॉस 14 मध्ये आपला वेगळा अवतार प्रेक्षकांना दाखवल्यानंतर ती आता पुन्हा एकदा आपल्या नवीन अवतारामुळे चर्चेत आली आहे. राखीचा हा नवीन अवतार तिने कसा केला हे पाहून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

बिग बॉस 14 दरम्यान राखीने तिचा ‘ज्युली’ अवतारही दाखवला होता आणि अभिनव शुक्लावर प्रेमाचा दावा करून एक वेडी प्रेमी सुद्धा ती बनली होती. आता राखी सावंतने घेतलेला नवीन अवतार म्हणजे श्रीदेवीचा ‘नागीन’ अवतार.


राखी सावंतचा हा नवा लूक पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्या हसण्यावर कंट्रोल करू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये राखी ‘मैं नागिन तू सपेरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. परंतु हा एक मॉर्फ्ड व्हिडीओ आहे ज्यामध्ये श्रीदेवीच्या चेहरावर राखीने तिचा चेहरा लावला आहे. हा व्हिडीओ ड्रामा क्वीन राखी सावंतच्या चाहत्यांना खूपच पसंतीला उतरत आहे. यात ती खूप मजेशीर दिसत असून लोकांच्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here