जावेद अख्तर बनवणार राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपट?

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी झाली होती. तिने टॉप ५ फायनलिस्टमध्ये स्थान देखील पटकावले होते. पण १४ लाख रुपये घेऊन राखीने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राखी सावंतने एका मुलाखतीमध्ये गीतकार जावेद अख्तर तिच्या जिवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले होते.

जावेद अख्तर राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे कळताच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. जावेद अख्तर खरच राखी सावंतच्या जीवनावर चित्रपट बनवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता खुद्द जावेद अख्तर यांनी यावर खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर म्हणाले, हे खरे. मी राखीला भेटलो होतो. लवकरच तिच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची स्क्रीप्ट मी तयार करणार आहे. चार- पाच वर्षांपूर्वी एका फ्लाइटमध्ये राखी मला भेटली आणि तिने तिच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. त्यावेळी मी तिच्या आयुष्यावर स्क्रीप्ट लिहू इच्छीतो असे मी म्हणालो होतो.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि स्क्रीप्ट रायटर जावेद अख्तर यांना राखीने तिच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या होत्या. करोना व्हायरस येण्यापूर्वी आम्ही भटलो होतो आणि जावेद अख्तर यांनी माझ्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी मला भेटायला बोलवले होते पण काही कारणास्तव मला जाता आले नाही असे राखी म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here