जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकावं,कुटुंबातील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जुन्नर (सौरभ चौधरी) – तालुक्यातील उदापुर गावात एकाच कुटुंबतील ६ संशीयतांचे कोरोना चाचणीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. उदापुर येथील एक रुग्णाचा अहवाल दि. १७ रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील १७ जणांचे नमुने तपासणीसाठी लेण्याद्री येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले होते.
त्यातील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सर्वाना पुढील उपचारासाठी लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. गावातील एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ७ झाली असून संपर्कात आलेल्यांचा तपास सुरू असून त्यांची यादी बनवून त्यांची तपासणी करून जे संशयित निगेटिव्ह आले आहे अशांना विलगिकरन करण्यात येणार आहे.अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सरोक्ते यांनी दिली.
परिसरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे तसेच घरात सुरक्षित राहण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे. गावातील सर्व व्यवसाय, आस्थापने अत्यावश्यक सेवा वगळता खबरदाई चा उपाय म्हणून बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत उदापुर तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here