विखरण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

दोंडाईचा (संतोष कोळी) – आज विखरण गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन चा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लहुजी शक्ति सेनाचे जिल्हाअध्यक्ष ओंकार देवीदास पगारे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री.पगारे यांनी सांगितले की, भारतीय साहित्याचे जनक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यकार , छत्रपती शिवरायांचा इतिहास साता समुद्रा पलीकडे नेणारे प्रथम शिवशाहीर, आपल्या लेखणीने शोषित, वंचित ,कामकरी ,कष्टकरी ह्यांचा संघर्ष मांडणारे दिन दुबळ्यांचे कैवारी, स्त्रियांच्या वेदना, त्यांची संघर्षमय जिवनगाथा त्यांचा परिस्थितीशी झुंज देण्याचा कणखरपणा आपल्या लेखणीद्वारे साकारणारे थोर साहित्यिक, मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवणारे साहित्यसम्राट, आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेमाचे बीज पेरणारे खरे देशभक्त , कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करणारा खरा लोक कलावंत, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामकऱ्यांच्या – कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असा महान संदेश देणारे विज्ञान वादी साहित्यिक, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ,कामगारांच्या व्यथा ,त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लेखणीस,त्यांच्या कार्यास,त्यांच्या विचारांस स्मरुन त्यांना विनम्र अभिवादन करुया. यावेळी विखरण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here