दोंडाईचा (संतोष कोळी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघाडी बु ता शिंदखेडा येथे होमिओपॅथीच्या गोळ्या शिवसेनेचे विधानसभा
क्षेत्रप्रमुख छोटू पाटील यांच्यातर्फे व तालुका संघटक डॉ मनोज पाटील, विभाग प्रमुख परमेश्वर वाल्हे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आज दि 18 जुलै रोजी शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात व सहसंपर्क प्रमुख अतुलभाऊ सोनवणे यांच्या आदेशाने शिवसेनेचे शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख माजी जि प सदस्य व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य छोटू पाटील यांच्यातर्फे वाघाडी बु ता. शिंदखेडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 वर मात करण्यासाठी जनतेची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्यांचे 700 पाकिटे शिवसेनेचे तालुका संघटक मनोज पाटील व विभागप्रमुख परमेश्वर वाल्हे यांच्या हस्ते वाटण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांचे शरीराचे तापमान देखील चेक करण्यात आले, याप्रसंगी शिवसेनेचे मोहन बागुल, शरद वानखेडे,उपसरपंच लक्ष्मण पाटील, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटू पाटील यांनी सांगितले की, जि प गट खलाने गटासह संपुर्ण तालुक्यात टप्याटप्याने होमिओपॅथीच्या गोळ्या वाटण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन करताना म्हणाले की कोरोनाला पळवून लावण्यासाठी आपली काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे, कामाशिवाय बाहेर जाऊ नका, सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी बोला, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे त्यांनी यावेळी सांगितले.







