जिल्हा परिषद सदस्यांचा वाढदिवस जोशात; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे मात्र, लोकप्रतिनिधी बिनदिक्कतपणे कोरोनाचे नियम मोडीत काढून जंगी वाढदिवस व इतरही विविध कार्यम पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर आदी ठिकाणी करताना दिसले. उल्लेखनीयबाब म्हणजे सदरील कार्यक्रमाची कुठलीही पोलीस परवानगी न घेता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करून नियमांची पायमल्ली करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरचे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य मंडप लावून शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जि. प.चे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, जि. प.सदस्य सय्यद कलीम यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती.

bhumipoojan-without-mask

कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी विनामास्क उपस्थित होते. एकीकडे नागरिकांना कोरोना संदर्भात जनजागृती करणारे लोकप्रतिनिधी दुसरीकडे स्वतःच्या कार्यक्रमात किती हलगर्जीपणा दाखवतात याचे मूर्तिमंत उदाहरण सदरील कार्यक्रम ठरला. विकास कामाचे भूमिपूजन करतेवेळीसुद्धा मास्क लावण्याची तसदी संबंधितांनी घेतली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here