नवरोबाच्या लग्नात कोरोना तपासणीने आणले विघ्न

लोणी सीमा तपासणी नाक्यावर कोरोना तपासणीला थांबवल्याने उडाला गोंधळ

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असून, यामुळे महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात येण्यासाठी सीमा बंद करण्यातआल्याने, एका नवरोबाच्या लग्नात कोरोनाने विघ्न टाकले आहे.

महाराष्ट्रातील रावेर तालुक्याचा लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात रोटी-बेटी व्यवहार असल्याने, महाराष्ट्रातील अनेक नवरदेवाचे मध्यप्रदेशातील वधूशी वाडनिश्चय नियोजित असताना, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणारे मार्ग सील केल्याने, अनेक जणांचे लग्न यामुळे अडचणीत सापडले आहे.

सकाळी लोणी (म.प्र.) या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू होती. ज्यांच्याकडे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे,त्यांना आत प्रवेश दिला जात होता, इतरांना मात्र प्रवेश नाकारण्यात आल्याने वऱ्हाडी मंडळीसह नवरदेवाची घालमेल झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here