लग्नाच्या दुसर्‍याच दिवसापासून नवविवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – शहरातील जिल्हापेठ परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला लग्नाच्या दुसर्‍याच दिवसापासून रंग, भाषेवरुन पतीसह सासरच्यांनी हिणविले. तसेच तु गावढंळ, खेडवळ म्हणत वेळावेळी शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी मुंबईच्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, दिपश्री यांचा प्रथमेश महेंद्र मणेरीकर यांचा सोबत विवाह झाला. लग्नाच्या दुसर्‍याच दिवसांपासून पती प्रथमेश, सासू व इतरांनी दिपश्री यांना त्याच्या रंगावरुन तसेच भाषेवरुन कामावरुन टोमणे मारण्यास सुरुवात केली.यानंतर दिपश्री यांचे आई वडील गिफ्ट म्हणून पैसे देत नाही, या कारणावरुन शिवीगाळ करत दिपश्री यांचा शारिरीक व मानसिक छळ केला.

दिपश्री यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात पती प्रथमेश, सासू सानिया मणेरीकर, सासरे महेंद्र मधुकर मणेरीकर, व पती महेंद्र यांचा सावत्र भाऊ उमेश विश्वास बर्वे सर्व रा. दादर पूर्व मुंबई या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here