नाशिक पुणे महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नाशिक-पुणे महामार्गावर सफरचंदच्या पेट्या वाहून नेणार्‍या कंटेनरला मध्यरात्रीच्या सुमारास गोंदे फाट्याजवळ अचानक आग लागली. या आगीत कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तथापि सिन्नर नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाने सुमारे दोन ते अडीत तासांच्या अथक प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली शिवाय कंटेनरमधील सफरदंचही वाचवले.

नाशिक-पुणे महामार्गाने सफरचंदच्या पेट्या घेऊन जाणार्‍या कंटेनरला गोंदे फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती सिन्नर नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला कळविल्यानंतर अग्नीशामक दलाचे जवान मंगेश कटारनवरे, जयेश बोरसे, लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे आदी वाहनासह घटनास्थळी हजर झाले.

तोपर्यंत कंटेनरच्या चालक कॅबीनमध्ये आगीने रौद्ररुप धारण केले होते. अग्नीशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले तर काही जवानांनी कंटनेरच्या पाठीमागील बाजूने कंटेनरमधील सफरचंदाच्या पेट्या उतरवून घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत एमआयडीसीचे आग्नीशामक दलही दाखल झाले.

दोन्ही वाहनांनी मिळून सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनरच्या कॅबीनला लागलेली आग आटोक्यात आली. तसेच कंटेनरमधील सफरचंदाच्या पेट्या उतवुन घेतल्याने जवळपास साडेपाच लाखांचे नुकसान टाळण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here