जागतिक महिला दिनी शिक्षकाने केला सहशिक्षिकेचा विनयभंग!

अकोला – सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना अकोल्यातील अकोटमध्ये एका शिक्षकाने महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी 8 मार्च रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कर्तृत्वान महिला आणि इतर क्षेत्रातीलमहिलांचा सन्मान केला जातो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र काही पुरुषांना याचं भान राहत नाही. असाच प्रकार अकोल्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत सर्वशिक्षा अभियान शिक्षण (गटसाधन केंद्र) कार्यालयात आठ मार्चला पाहायला मिळाला. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेचा विनयभंग केला.

शिक्षिकेने अकोट पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली. आरोपी व फिर्यादी दोघेही अकोट सर्वशिक्षा अभियान शिक्षण विभाग येथे कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरापासून आरोपी शिक्षक तक्रारदार शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. अश्लील नजरेने पाहायचा, नेहमीच धक्का लावून जायचा, मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अखेर कंटाळून पीडित शिक्षिकेने अकोट शहर पोलिसात शिक्षका विरुद्ध आठ मार्चला तक्रार दिली.

या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंविचे कलम 354(अ), 354(ड) नुसार गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर करत आहेत. शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी समित्या गठीत केल्या आहेत. मात्र, तरीही नोकरदार महिला सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात, आपल्या परिवारासाठी घराबाहेर पडून जिवाचं रान करणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्वाची आता महत्वाची ठरत आहे. दिवसेंदिवस असे प्रकार घडत असल्याने,अश्या नराधमांना कायद्याची भीती उरली नाही. शासनाने महिला सुरक्षे संदसर्भात कठोर पावले उचलून अश्या आंबट शौकिनांना लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here