ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दि. 8 मार्च रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन लाँन मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष माननीय नितिन शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या महिलातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्य करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे निमंत्रक सहसचिव ज्योती चिदंरकर,ठाणे कल्याण प्रसिध्दी प्रमुख मिनल पवार, ठाणे शहर सचिव प्रतिनीधी मिलींद दाभोळकर, ठाणे शहर जिल्हा मुख्य सल्लागार विकास पाटील, सल्लागार सतीशकुमार भावे, ठाणे शहर संघटक अखिलेश पाल, सहसचिव प्रमोद घोलप हे होते.
यावेळी व्यासपिठावरील प्रमुख पाहुणे ठाणे महानगर पालिकेच्या उपमहापौर पल्लवी कदम, सहाय्यक आयुक्त डाँ. अनुराधा बाबर ,नगरसेविका प्रतिभा मढवी , नगरसेविका उषा भोईर, भगवती शाळेच्या प्राध्यापिका विकासनी हुलावले, माहिती जनसंपर्क अधिकारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका मनिषा फोफळे, मनसे उपाध्यक्ष समिक्षा मार्कडे उपस्थित होत्या. व्यासपिठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिता अर्चना पवार यांनी तर आभारप्रदर्शन रणविरसिंग राजपूत यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला विषयी मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महानगर पालिकेचे उपमहापौर पल्लवी कदम म्हणाल्या की सावित्री बाई फुले यांच्या प्रेरणे ने आज महिला या सक्षम, सुशिक्षीत आहेत ,नगरसेविका उषा भोईर म्हणाल्या महिला या पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत .सहाय्यक आयुक्त डाँ. अनुराधा बाबर म्हणाल्या महिला दिन हा एक दिवस साजरा न करता नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे
व्यासपिठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डाँ निकिता भावे, डाँ निता पाटील, माधवी कदम ग्रामसेविका, अनुजा घाडगे पोलिस, हर्षदा जाधव, शिल्पा पाटणकर, समाजसेविका, दुर्गेश नंदा -मुरलीधरन कोविड योध्दा, लक्ष्मी पटेल पत्रकारिता, जयश्री रामाणे महिला उद्योजिका, भाग्यश्री प्रधान पत्रकार, संध्या भोईर पंडित स्वप्नाली पवार विशेष कार्य करणार्या महिलांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची छायचित्रे सुभाष जैन पत्रकार यांनी केले. अश्विनी भालेराव -तरूण आव्हान प्रतिनीधी, मनस्वी चौधरी न्यूज मराठी बाणा, पल्लवी होनखंडे तरूण आव्हान गणेश गव्हाणे, संजय तामडे, अश्विन कांबळे, देवेंद्र शिंदे, अमित जाधव, प्रशांत मोटे, राहुल लाड, महेशचंद्र जोशी यावेळी उपस्थित होते






