मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री झरीन खानने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण झरीनला तिच्याकडून अपेक्षित असल्याप्रमाणे करिअरमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण झरीन सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे.
चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देतात. अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठीची कोणतीही संधी सोडत नाही. तिने नुकतेच बाथटबमध्ये आंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
तिच्या या फोटोंच्या माध्यमातून झरीन चाहत्यांसाठी किलर अदा दाखवत आहे. तिने इंस्टाग्रामवर अत्यंत हॉट फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच पसंत येत आहेत. या फोटोंमध्ये झरीन बाथटबमध्ये झोपून हॉट पोज देताना दिसत आहे.
झरीनचे हे फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. तसेच असंख्य चाहते तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत. हे फोटो शेअर करताना झरीन खानने कॅप्शन लिहिलं की, तो- ‘तुझी सुपर पॉवर काय आहे ?’ …. मी- ‘मी एक महिला आहे’. सर्व प्रेमळ महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. खरंतर झरीनला डॉक्टर बनायचं होतं. चित्रपट क्षेत्रात करीयर करण्याचा तिने कधी विचारही केला नव्हता.
सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून झरीनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटासाठी सलमान खानने स्वतः तिला अॅप्रोच केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाचं आदळला होता.
यानंतर झरीन खान सलमान खानच्या फिल्म ‘रेड्डी’ चं आयटम सॉंग ‘कॅरेक्टर ढिला है’ मध्ये दिसली होती. त्यानंतर ती बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या ‘हाऊसफुल 2’ मध्येही झळकली. तर ‘हेट स्टोरी 3’ हा तिचा विशेष गाजलेला चित्रपट आहे.






