आता आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्याला उपविभागीय पोलिस अधिकारीची हजेरी

तक्रारदाराची तक्रारीचे निराकरण होणार

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामकाज पारदर्शी राहावे म्हणून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील साहेब यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना( डीवायएसपी) आठवड्यातून एकदा खुलताबाद पोलीस ठाण्यात हजेरी देणे सक्तीचे केले आहे

यासाठी वेळापत्रक देखील जारी करण्यात आलेला आहे पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन जाणार्‍या काही नागरिकांना न्याय मिळत नाही त्यांच्या तक्रारीचे निराकरण होत नसल्याने अनेक तक्रारदार पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी घेऊन येतात ककोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पाटील यांनी पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकेदिवशी उपस्थित राहून जनतेच्या तक्रारी जाणून घ्यावात असे आदेशित केले आहे

आठवड्यातला एक दिवस उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने ठाण्यात भेट देऊन परिसराची पाहणी करावी ठाण्याचा अभिलेख तपासावा गुन्हे अभिलेख प्रकरणाचा आढावा घ्यावा तसेच ठाण्यातील कर्मचारी यांचा आज्ञा कक्षा घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात यानंतर परिसरातील नागरिकांना त्यांच्या तक्रारीबाबत प्रत्यक्ष भेटून त्यांची ग्रहाणी.जाणून घेत तातडीने त्यांचे तक्रारारीचे निराकरण करावे असे देखील पाटील यांनी उपविभागीय अधिकारी आदेशित नमूद केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here