जळगाव जिल्ह्यात वाढला संसर्ग; आज आढळले ९८३ कोरोनाबाधित

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोनाशी यशस्वीपणे लढा देण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असले तरी लोकांच्या बेफिकीरीने कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ९८३ कोरोनाबाधित आढळून आले. यात जळगाव शहरासह बहुतांश तालुक्यांमधील रूग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच दिलासा देणारी बातमी म्हणजे आज दिवसभरात ४४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आढळलेल्या ९८३ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक जळगाव शहर – २२२ तर जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ-५७, अमळनेर-५८, चोपडा-१३३, पाचोरा-१७, भडगाव-१५, धरणगाव-७१, यावल-१३, एरंडोल-२, जामनेर-१६३, रावेर-३२, पारोळा-३०, चाळीसगाव-१०२, मुक्ताईनगर-२४, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातून ९ असा समावेश आहे.

जिल्हा कोविड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आज एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात जळगाव शहरातील दोन तर चोपडा, भडगाव, एरंडोल आणि चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. आजवर एकूण ६६ हजार ७२६ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५९ हजार ५८० रूग्णंनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप ५ हजार ७२५ रूग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here