लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नंट?

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने २५ डिसेंबर रोजी दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केले. त्यांच्या लग्नातीला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर गौहरने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. चित्रीकरणासाठी ती लखनऊला गेली होती. चित्रीकरण संपल्यानंतर ती झैदसोबत उदयपुरला हनीमूनसाठी गेली. आता गौहर खान प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा झैदने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सुरु झाल्या होत्या. खुद्द गौहर खानने यावर वक्तव करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

गौहरचा पती झैदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये झैद कोणी तरी येणार असे बोलताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत झैदने, ‘हे कन्फर्म आहे, आमच्यामध्ये आता एक नवा अतरंगी येणार आहे. या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हाला काय वाटते? कोण असू शकते? कमेंट करुन सांगा’ या आशायचे कॅप्शन दिले आहे.


झैदने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत गौहर प्रेग्नंट आहे? असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका यूजरने तुमच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
gauhar-khan-tweet
सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चांवर गौहर खानने वक्तव्य करत पूर्ण विराम दिला आहे. तिने ‘तुम्हाला वेड लागले आहे का? मी माझ्या वडिलांना नुकतेच गमावले आहे. त्यामुळे एखाद्या विषयी काही लिहिताना विचार करा.. मी प्रेग्नंट नाही. धन्यवाद’ या आशयाचे ट्वीट गौहर खानने केले आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here