शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी त्याने स्वतःच्याच ६ महिन्यांच्या मुलीची केली हत्या

नोएडा – ग्रेटर नोएडाच्या रबपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नराधम बापानेच आपल्या सहा महिन्यांच्या मुलीची हत्या केली. दारुच्या नशेत त्याने आपल्या मुलीला जमिनीवर आपटले आणि तिची हत्या केली, असा त्याच्यावर आरोप आहे. हत्येचा आरोप शेजाऱ्यावर केला आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सोमवारी संध्याकाळी भीकनपूर गावात शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. एकाने आपल्याच सहा महिन्यांच्या मुलीची हत्या केली. त्याने या हत्या प्रकरणात शेजाऱ्याला अडकवण्याचा कट रचला. त्याच्यावर मुलीच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान आरोपीने कबुली दिली. शेजाऱ्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्याने हा कट रचला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या घटनेचा तपास केला. मुलीच्या बापाला दारूचे व्यसन होते. त्याला पाच मुली आणि एक मुलगा आहे. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेवेळी आरोपी दारूच्या नशेत होता. रबुपुरा पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here