बंगळुरु – आता ऑनलाइन फूड डिलिवरी अॅप चांगलेच तेजीत आहेत. ग्राहकांना यामुळे चांगली सोय होते. मात्र बऱ्याचदा या कंपन्यांचे चूकीचे अनुभव देखील ग्राहकांना आले आहे. अशाच एका महिलेने आपल्या घरी ऑनलाइन फूड डिलिवरी अॅप झोमॅटोवरून जेवण मागवलं मात्र तिला भयंकर अनुभव आला.
फूड डिलिवरी उशिरानं होत असल्यानं महिलेने आपली ऑर्डर कॅन्सल केली. काहीवेळानं डिलिवरी बॉय जेवण घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचला आणि जेव्हा महिलेने ते घेण्यास नकार दिला तेव्हा आरोपी डिलिवरी बॉयने रागात तिच्या चेहऱ्यावर एक पंच मारला. महिलेच्या नाकातून भळाभळा रक्त वाहायला लागलं.
पीडित महिलेने व्हिडीओ बनवून त्याची माहिती लोकांना दिली. तो व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये महिलेने संपूर्ण माहिती दिली आहे. महिलेने सांगितले की झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ऑर्डरला उशीर होत असल्यानं महिलेनं कंपनीच्या कस्टमर केयरवर फोन केला आणि डिलिवरी वेळेवर न मिळाल्यानं ऑर्डर रद्द केली. कस्टमर केयर बोलत असतानाच डिलिवरी बॉय घरी जेवण घेऊन आला.
महिलेने जेवण घेण्यास नकार दिला. महिलेसोबत त्याची वादावादी झाली. त्यानंतर त्यानं जेवणाचा बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न केला. महिलेने घरात शिरण्यास नकार दिल्यावर तो चिडला आणि तुझा नोकर आहे का असे म्हणत तिच्या नाकावर ठोसा दिला. मग तो फरार झाला.
कुणीही महिलेच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या घटनेनं ती प्रचंड घाबरली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने उपचार घेतले. मेरी वर्तमान स्थिति बात करने लायक भी नहीं है. पोलिसात तक्रार दिल्यावर त्यांनी मदतीचं आणि आरोपीला पकडण्याचं आश्वासन दिलं.
महिलाच्या आरोपांवर झोमॅटोने प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली. कंपनी आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करून पोलिसांना संपूर्ण सहाय्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.






