डेहराडून (उत्तराखंड) – गेल्या चार दिवसांत झालेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते आता राज्याचे १० मुख्यमंत्री बनले आहे. राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. यापूर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांसह अनेक बडे नेते उपस्थित होते.
मी सर्वांना सोबत घेऊन पुढे चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसोबत कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. वाजपेयी आमच्यासोबत जमिनीवर बसून जेवले आहेत. ट्रेनमध्ये सामान्य डब्यातून प्रवास केला. यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या यशात संघाकडून मिळालेली प्रेरणा आहे. पत्नी, आई-वडील सर्वांची मला साथ आहे, असं तीरथ सिंह रावत म्हणाले.
तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्याला प्रशासकीय आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. आपल्या नेतृत्वात राज्याची आणखी प्रगती होईल, यावर माझा विश्वास आहे, पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले.
Congratulations to Shri @TIRATHSRAWAT on taking oath as the Chief Minister of Uttarakhand. He brings with him vast administrative and organisational experience. I am confident under his leadership the state will continue to scale new heights of progress.
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2021
मी सर्वांना सोबत घेऊन पुढे चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसोबत कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. वाजपेयी आमच्यासोबत जमिनीवर बसून जेवले आहेत. ट्रेनमध्ये सामान्य डब्यातून प्रवास केला. यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या यशात संघाकडून मिळालेली प्रेरणा आहे. पत्नी, आई-वडील सर्वांची मला साथ आहे, असं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीरथ सिंह रावत म्हणाले.
तीरथ सिंह रावत यांचा जन्म ९ एप्रिल १९६४ ला गढवालमधील पौडी येथे झाला. आता ते पौडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. यापूर्वी २०१२-२०१७ मध्ये चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. ते भाजपचे राष्ट्रीय सचिवही होते. त्यांनी श्रीनगर गढवाल येथील बिर्ला कॉलेजमधून समाजशास्त्रचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी पत्रकारितेत डिप्लोमा केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आरएसएससोबत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.






