रोटरी दोंडाईचाचे कार्य संपुर्ण रोटरीला मार्गदर्शक

दोंडाईचात रोटरी सिनियर्सचे पदग्रहण समारभांत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी

दोंडाईचा (संतोष कोळी) – दोंडाईचा शहरातील अग्रगण्य सामाजिक संघटना रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० चे गव्हर्नर प्रंशात जानी यांच्या हस्ते संपन्न झाला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे उद्योगपती सरकारसाहेब रावल , डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ( नियोजित )श्रीकांत इंदाणी , अँसिस्टंट गव्हर्नर अनिष शाह ,रोटरी सिनियर्सचे माजी अध्यक्ष सचिन पारख , नुतन अध्यक्ष चेतन सिसोदिया , सचिव राजेश माखीजा इ मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते .
शपविधीसमारंभात व्यासपीठावरुन बोलतांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी सांगितले की रोटरी दोंडाईचा नागरीकांसाठी अनेक कायमस्वरुपी प्रकल्प राबवीत आहे त्यात रोटरी स्कुल ,आय हॉस्पिटल , पतपेढी ,जयपुर फुट इ सर्व प्रकल्प जनसेवेत आजही आपली दर्जेदार सेवा अविरत देत आहेत आम्ही इतर रोटरी क्लबला नेहमीच रोटरी दोंडाईचाला भेट देऊन अनुकरण करण्याचे आवाहन करतो . उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी मार्गदर्शनात रोटरीच्या कार्याची प्रशंसा करुन नुतन अध्यक्ष चेतन सिसोदिया व कार्यकारणीस शुभेच्छा दिल्यात ,माजी मंत्री तथा आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन नुतन अध्यक्ष चेतन यांस लहानपणापासून ओळखत असल्याने धडाडीचा युवा कार्यकर्ता असुन त्यांच्या नेतृत्वात रोटरी नविन भरारी घेईल असा आशावाद व्यक्त केला .श्रीकांत इंदाणी यांनी रोटरीच्या माध्यमातून जनतेसाठी अनेक प्रकल्प हाती घेऊन समाजकार्य करण्याची संधी उपलब्ध आहेत असे सांगितले .अँसिस्टंन्ट गव्हर्नर अनिस शाह यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्याकडुन आलेले प्रकल्प राबवीण्याचे आवाहन केले .
माजी अध्यक्ष सचिन शाह यांनी वर्षभरात राबवलेल्या प्रकल्पांची माहिती दिली .नुतन अध्यक्ष चेतन सिसोदिया यांनी वर्षभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या गरजेनुसार शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सँनिटायजर स्टँड बसवुन गरजुंना फेस मास्क वाटप सुरु करण्यात आले आहेत तसेच वर्षभरात वैद्यकीय शिबिरे , सांस्कृतिक कार्यक्रम, तरुणांना करीयर गाइडन्स ,वृक्षारोपण इ कार्यक्रम घेण्यात येतील असे सांगितले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोटरीचे सदस्य व शिंदखेडा तालुक्याचे कोविड केंद्राचे प्रमुख डॉ हितेंद्र देशमुख यांना उत्कृष्ट सेवेसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .रोटरी सिनियर्सने आपली सेवा अविरत सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी नविन सदस्य घेण्यात येतात त्याचप्रमाणे यावर्षी नविन सदस्यांत प्रविण महाजन ,जवाहर केसवानी , डॉ अनिकेत मंडाले ,अमन जयस्वाल , डॉ मोहीत अग्रवाल यांना मान्यवरांच्या हस्ते पिन देऊन शपथ देण्यात आली .कार्यक्रमाचे अतीशय सुंदर नियोजन राजेश मुणोत व सौरभ मुणोत यांनी अहिंसा परिवाराच्या माध्यमातून हिरवळीवर केले कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक सदस्यांचे थर्मल स्कँनिंग करुन प्रत्येकास सँनिटायझर व आवश्यकतेनुसार फेस मास्क देण्यात आले .बैठक व्यवस्थेत प्रत्येक आसनात किमान दोन मिटर अंतरावर ठेवण्यात आले .
कार्यक्रमास लायन्सचे अध्यक्ष हमजा जिनवाला ,विशाल सोनार ,रोटरी सनरायझर्सचे अध्यक्ष कुलदीप गिरासे ,आर सी सी दोडाईचेकरचे अध्यक्ष जे.एन.राजपुत ,आर.सी
सी .अंपग दोंडाईचाचे अध्यक्ष डॉ नरेंद्र गिरासे ,आर.सी.सी रामी-पथारेचे अध्यक्ष नंदुसिंग राजपुत ,रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष
नागसेन ,निलेश तंवर इ मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र पाटील , राजेंद्र परदेसी यांनी केले . डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांचा परिचय सौरभ मुणोत यांनी डिजीटल प्रोजेक्टरवर करुन दिला .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव राजेश माखीजा यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ सदस्य डॉ रविंद्र टोणगांवकर , डॉ आशाताई टोणगांवकर ,राजेश मुणोत ,राजेश भंडारी ,नामदेव थोरात ,विजय अडगाळे ,केटी ठाकुर ,सुंदर चैनानी ,संजय छाजेड ,रमेश पारख ,प्रदीप पारख ,हुसेन विरदेलवाला ,अँड नितीन अयाचीत , डॉ राजेंद्र पाटील , डॉ दिपक श्राँफ , डॉ राजेंद्र गुजराथी ,शेखर कोठारी , महेंद्र चोपडा , डॉ हितेंद्र देशमुख ,सुमित जैन ,डॉ अनिल धनगर , डॉ गणेश खैरनार , नितेश माखीजा ,डॉ मुकुंद सोहनी , डॉ अनिल सोहनी ,सौ अनुराधा सोहनी इ सदस्यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here