नाशिक (प्रतिनिधी) – कोरोना महामारीने सगळीकडेच थैमान घातले आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या जिवितासाठी आपल्या
जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत राहणारे पोलीस दल हे खरे कोरोना योध्दा असून, त्यांची प्रतिकार क्षमता वाढावी म्हणून नाशिक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना भारतीय जनता युवामोर्चाचे चिटणीस तन्मय गांगुर्डे यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी अंबड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी कैलास निंबाळकर आणि वाघ उपस्थित होते. तेव्हा त्यांना भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस तन्मय गांगुर्डे यांनी त्यांचा सत्कार करुन, त्यांना कोविड योध्दा असं संबोधून आर्सेनिक अल्बमच्या १०० गोळ्यांचे वाटप केले. सोबत देवेंद्र निकम, प्रतीक आहेर, योगेश आळंदे, प्रेम जाधव, भावेश निकम, चैतन्य सूर्यवंशी हे उपस्थित होते.








