हनुमानगढ (राजस्थान) – तालुक्यातील खुइया हे गाव दारूसाठी प्रसिद्ध आहे. दारू पिणाऱ्यांसाठी नव्हे तर दारूच्या दुकानांसाठी. दारूचे दुकान विकत घेण्यासाठी तिथे एकमेकांत स्पर्धा लागते.
अलीकडेच तिथे एका छोटय़ा दुकानाचा लिलाव झाला. त्या दुकानासाठी किरण कंवर आणि प्रियंका कंवर या नणंद-भावजयीने बोली लावली. सकाळी 11 वाजता सुरू झालेला लिलाव दुसऱ्या दिवशीच्या पहाटे 2 वाजेपर्यंत चालला. 72 लाख रुपयांनी लिलावाला सुरुवात झाली. दोघींनी एकापेक्षा एक बोली लावली.
अखेरीस किरण कंवर हिच्या 510 कोटी 10 लाख 15 हजार रुपयांच्या बोलीने लिलाव संपला. नियमाप्रमाणे ती तीन दिवसांत त्यातील एक टक्का रक्कम जमा करू न शकल्याने अबकारी विभागाने तिचे डिपॉझिट जप्त करतानाच तिला तीन वर्षांसाठी काळय़ा यादीत टाकले.






