ठाण्यामध्ये एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण आग

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाण्याच्या अंबरनाथच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात असलेल्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. कारखान्यात असलेल्या एका बायलरमध्ये ही आग लागली आणि थोड्याच वेळात संपूर्ण कारखान्यात आग पसरली आहे. मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत आहे.

अंबरनाथवरील विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ही आग लेव्हल 2 ची आहे. आग विझवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. पहाटेच्या वेळी कारखान्यात मोजकेच लोक होते. सर्वांना वेळीच बाहेर काढले गेले आहे. कारखान्यातील केमिकलमुळे त्यातून निघणारा काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज आजुबाजूच्या फॅक्टरी बंद करण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी 3 फायर इंजन आणि 2 वॉटर टँकर उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. फॅक्ट्रीमधून निघणाला काळा धूर आजुबाजूच्या परिसरात पसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here