नोकरी देण्याच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावून महिलेवर बलात्कार

अल्वर (राजस्थान) – जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. अलवर शहरातील रेल्वे स्थानकानजीक एका हॉटेलात नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. सोमवारी ही घटना घडली. महिलेने महिला पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, दीड महिन्यापूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर किशन सिंह नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली. त्यानंतर नोकरी देण्याच्या बहाण्याने किशन याने महिलेला रेल्वे स्थानकानजीक एका हॉटेलात बोलावले. त्याने सांगितलेल्या ठिकाणी महिला पोहोचली. तिथे खोलीत नेऊन तिच्यावर बळजबरी केली. याबाबत कुठेही वाच्यता केली तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपीने तिला दिली.

पीडितेने सोमवारी आरोपीविरोधात महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपी फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस छापे मारत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, नोगांवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेने तक्रार दिली आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर ओळख झालेल्या आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध सुरू आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here