गांधीनगर – देशात करोना लसीकरण मोहीम शक्य तितक्या गतीनं सुरू आहे. याच दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांनीही करोना लसीचा पहिला डोस घेतला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली.
‘मला हे सांगताना आनंद होत आहे की माझ्या आईला करोना लसीचा पहिला डोस आज देण्यात आला. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, की जे कुणी लस घेण्यासाठी पात्र असतील त्यांनी स्वत:ही लस घ्या आणि इतरांनाही करोना लस घेण्यासाठी प्रेरित करा’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
Happy to share that my mother has taken the first dose of the COVID-19 vaccine today. I urge everyone to help and motivate people around you who are eligible to take the vaccine.
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2021
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वय आता 100 च्या जवळ पोहोचलं आहे. 70 वर्षांच्या मोदींनी स्वतः 1 मार्चलाच लस घेतली होती. त्यांनी भारतीय बनावटीची ही लस घेतली होती. देशभरातील कोरोना पेशंट्सची संख्या रोज वाढत आहे.त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवला आहे. आता लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होणार आहे. त्यात 50 वर्षांपुढच्या नागरिकांचं लसीकरण होणार आहे.






