दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या हटके डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडच्या दुनियेतील हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात आणि नेहमीच आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात.

दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवरून तिचा आणि रणवीरचा एक नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डान्ससोबतच हे कपल धमाल-मस्ती करताना सुद्धा दिसून येत आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज अतिशय आवडला आहे.

बुसिट चॅलेंज या हॅशटॅगखाली दीपिकाने हा व्हिडीओ तयार केला आहे. तिने त्याला ‘वर्क इट बेबी.’ असं कॅप्शन दिल असून त्यामध्ये रणवीर सिंगला देखील टॅग केलं आहे. हा व्हिडीओ केवळ एका तासामध्येच 4 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत, यावरूनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here