चार जणांना आठ देशी बनावटीच्या पिस्तूल व जिवंत काडतुसांसह पुण्यात अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जळगावहून पुण्यात शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या उच्चशिक्षित सराईतासह चौघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे पिस्तूल, 15 जिवंत काडतुसे असा 4 लाख 30 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

भूषण महेश मराठे (वय – 23, रा. चोपडा, जळगाव) असे अटक केलेल्या मुख्य सराईताचे नाव आहे. राहुल चंद्रकांत पवार (वय – 23, रा. नसरापूर, भोर), तौफिक गुलाब शेख (वय – 25, रा. शिवाजीनगर) आणि राम गोरोबा जाधव (वय – 25, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यात येत होती. त्यावेळी जळगावमधून एकजण पिस्तूलांची विक्री करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून भूषण मराठेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्तूल आणि 6 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली.

चौकशीत त्याने पुणे शहरासह ग्रामीण भागामध्ये पिस्तूलांची विक्री केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला दिली. त्यानुसार पथकाने राहुल पवार, तौफिक शेख, राम जाधव यांना अटक केले. त्यांच्याकडून 5 पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

राहुल पवार सराईत गुन्हेगार असून राजगड पोलीस ठाण्यातंर्गत त्याच्याविरूद्ध 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर राम जाधव विरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी परराज्यातील टोळीकडून पिस्तूल पुरविण्यात येत आहे का, यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, राहूल उत्तरकर, संग्राम शिनगारे, प्रदीप गाडे, अमोल पिलाणे, भूषण शेलार, शैलेश सुर्वे, मोहन येलपले, रूपाली कर्णवार, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली. आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here