धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील प्रजापीता ईश्वरीय ब्रह्मकुमारी सेवा केंद्रतर्फे 85 व्या महाशिवरात्री निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धरणगाव न पा चे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, काँग्रेसचे नेते दिनकर अप्पा पाटील, संजीवनी दीदी,माया पवार,निकिता पवार,व सेवेकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पी एम पाटील सर व नीलेश चौधरी नगराध्यक्ष यांनी ईश्वरीय विद्यालयाच्या नियोजित जागेवर बांधकाम करण्यासाठी व परवानगी मिळण्या साठी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न करून सेवेकरी साठी उत्कृष्ट इमारत बांधून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्वांना महाशिवरात्री निमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले.







