पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – खेड शिवापूरमध्ये दोघा चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील कामगारांना रिव्हॉलवरचा धाक दाखवून 2 लाख 37 हजाराची लूट केल्याची घटना काल मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात पुणे-सातारा रोडवर असलेल्या ‘एल कुदळे अँड सन्स’ या एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर काल रात्री साडे बारा वाजता पंपावरील कर्मचारी दिवसभरातील पैशांचा हिशोब करीत होते. त्यावेळी तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर रिव्हॉलवर रोखून 2 लाख 37 हजार रूपये रोख रक्कम व दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल अशी 2 लाख 47 हजार रूपयाची लुट केली. लुटीची घटना कॕमे-यात कैद झाली असून या प्रकरणी राजगड पोलीस तपास करत आहेत.






