म्यानमार – येथे लोकशाही आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आज आणखी 6 आंदोलक ठार झाले. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात जबर जखमी झालेल्या एका आंदोलकाचा फोटो एका पत्रकाराने सोशल मीडियाकर पोस्ट केला आहे.
सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला, असे अन्य एका आंदोलकाने आणि रुग्णालय कर्मचाऱयाने वृत्तसंस्थेला सांगितले. आंदोलक शांततेने निषेध व्यक्त करत होते. तरीही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकर गोळीबार केला, असे अन्य एका व्यक्तीने वृत्तसंस्थेला सांगितले.
पोलीस ठाण्यासमोरच निदर्शने करणाऱया आंदोलकांना लक्ष्य करण्यात आले होते. पोलिसांनी थेट बंदुकीतून खऱया गोळ्या आंदोलकांवर झाडल्या. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारमधील लष्करी राजकटीकर तीक्र टीका वरून आंदोलनविरोधी कारकाई तातडीने थांबकण्याची सूचना केली आहे. सुरक्षा परिषदेच्या या निवेदनावर चीनचीही स्काक्षरी आहे.






