मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला पती, गायक निक जोनास याच्यासोबत 93 व्या अॅकेडमी अॅवॉर्ड म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करणार आहे. येत्या 15 मार्चला ही यादी जाहीर करणार असल्याचे प्रियांकाने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
सोमवारी 23 विभागांतील नामांकन यादीचे लाईव्ह प्रक्षेपण दोन भागांत केले जाणार आहे. ऑस्कर डॉट काॅम, ऑस्कर डॉट ओआरजी तसेच अॅकेडमीच्या फेसबुक, ट्विटर आणि युटय़ूबवरून थेट प्रसारण होईल.
यापूर्वी 2018 साली देखील प्रियांकाने ऑस्करची नामांकने जाहीर केली होती. 93 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 28 फेब्रुवारीला होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हा सोहळा 25 एप्रिलला होणार आहे.






