जळगाव शहरात सर्वाधिक ३१० तर जिल्ह्यात ९५४ कोरोनाबाधित आढळले

corona-case-high

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहून प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे रात्री आठवाजेपासून जनता कर्फ्यूला प्रारंभ झाला. जनता कर्फ्यू सुरु होण्याआधीच कोरोनाने पुन्हा शहरवासियांना धोक्याची सूचना दिली आहे. आज जळगाव शहरात ३१० कोरोनाधित तर जिल्हा ९५४ कोरोनाबाधित आढळले.

आज आढळलेल्या ९५४ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ-७०, अमळनेर-१८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातून ४ असा समावेश आहे.

आज जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात एकुण ६७ हजार ६८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार २४८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर चोपडा आणि बोदवड तालुक्यातून प्रत्येकी एक असे एकुण ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here