पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मागील वर्षभरात २०२०मध्ये अनेकदा MPSC ची परीक्षा कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. आज सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश पहायला मिळाला आहे.
पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्या अनेकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे. युवा कॉंग्रेसचे सत्यजित तांबे, एनसीपी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत एमपीएसीने कोरोना संकटात पुरेशी खबरदारी घेत परीक्षा घेण्याची विनंती सरकारकडे केली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या वेळेस किंवा केंद्रीय आयोगाच्या परीक्षेच्या वेळेस कोरोना आड येत नाही का? हा केवळ एमपीएससी स्पर्धेच्या वेळीच आडवा कसा येतो? अशा संतप्त प्रतिक्रिया विध्यार्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






