भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोरोनाबाधित

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला असताना आता भारतीय फ़ुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे.

सुनीलने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.“मी ठणठणीत आहे. मला कोणताच त्रास नाही. मी लवकरच मैदानात परतेन”, असा आशावाद सुनीलने ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. तसेच सुनीलने नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करा, असं आवाहनही ट्विटद्वारे केलं आहे. सुनीलने काही दिवसांपूर्वी गोव्यात इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत बंगळुरु एफसीचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. ”


या आधी पोर्तुगलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अनेक स्टार क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here