अकोला – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं होणारी वाढ चिंतेत भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजेच शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून 15 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सगळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेताल काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हे लॉकडाऊन आज रात्री आठ वाजल्यापासून १५ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. आवश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहाणार आहे. तर, पेट्रोल आणि डिझेलही केवळ अत्यावश्यक सेवेतील गाड्यांनाच दिलं जाणार आहे.






