शहादा शहरात सट्टा व मटका बहाद्दरांचा धुमाकूळ

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार शहरापाठोपाठ शहादा शहारात देखील सटटा बाजार तेजीत सुरू असून खेड्यापाड्यातील लोक याच्या मोहाला बळी पडत आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठ परिसरात ठिकठिकाणी टपऱ्या व दुकानामध्ये सट्टा व मटका सर्रासपणे घेतला जात आहे.तरी याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात सट्टा व्यवसायासाठी अलिशान वातानुकूलित कार्यालयेदेखील थाटण्यात आली आहे. सट्टा व्यवसाय कुणी बंद करु शकणार नाही किंवा कुणाची बंद करण्याची हिंमतदेखील नाही या अर्विभावात सट्टा व्यवसायीक राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. अनेक सामाजिक संघटना व राजकीय पुढारी हे अवैध धंदे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

सट्टा व्यवसायाविरोधात बोलले तर नाहक सट्टाबहादरांचा रोष ओढवून घ्यावा लागेल या भीतीने शहरातील सुजाण नागरिक याबाबतीत तक्रार पुढे येत नाहीत. गोरगरीब जनतेला लाखो रुपयांची प्रलोभन दाखवून मोलमजुरी करून कमावलेली कष्टाची रक्कम देखील या सट्टा बाजारात संपुष्टात येत आहेत. बऱ्याचवेळा सट्टा लावण्यासाठी लहान शाळकरी मुलांनादेखील पाठविले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भावी पिढीवर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सट्टा व्यवसायावर कारवाई करताना सट्टा पेढीचे मुख्य सुत्रधारांवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. शहरातील पोलीस यंत्रणा यासाठी कार्यरत असून ते हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. जणू त्यांच्याच आशीर्वादाने हे सुरू आहे? पोलीस प्रशासनाकडून या अवैध धंद्याकडे का व कशासाठी दुर्लक्ष करीत आहे? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. चुकुन एखाद्या व्यक्ती मास्क किंवा गाडीचे कागदपत्रे विसरला तर त्यावर पटकन कायद्याचा बडगा उगारला जातो. मग शहरात सुरु असलेले अवैध धंदे हे धनदांडग्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे असे म्हणावे लागेल का? असो या सट्टा बहाद्दरांवर कारवाई पोलिस कारवाई होणार की नाही ? याचीच चर्चा आता शहरवासियांत सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here