नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – महिला दिनाचे औचित्य साधून शिवनेरी मिसळ हाऊस व भोजनालयाच्या सौ. निर्मला चक्रधर राजदेव यांनी खारघर स्वप्नपूर्ती येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी सरकार ने दिलेल्या सर्व नियमावली संभाळून मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम पार पडण्यात आला.
तसेच, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल बिडवे (पी आय क्राईम खारघर), नेहाताई शिंदे (समाजसेविका आणि आजाद समाज पार्टी महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा), लेडी टाइगर सौ. रिटा दिपक खारकर (पोलिस सहायता संघठन ऑल इंडिया नवी मुंबई अध्यक्ष – स्वराज्य चित्रपट कामगार युनियन अध्यक्ष महाराष्ट्र-ओम साई महिला मंडळच्या संस्थापक) यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शन यावेळी महिलांना दिले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या समाजसेविका आणि आजाद समाज पार्टी महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांनी स्त्रियांचा आदर सन्मान हा फक्त महिलादिनाच्या दिवशी न करता दैनंदिन जीवनात आपल्या वागण्या-बोलण्यातून केला पाहिजे. व तसे संस्कार आपल्या मुलांन मध्ये रुजवले पाहिजेत. आज आपल्या महिला ज्या काही आहे त्या आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आणि पण आजच्या महिलांना त्यांचा विसर पडत चालला आहे, रोज वर्तमान पत्र उघडताच आपण बघतो महिला अत्याचाराच्या 2 ते 3 बातम्या वाचायला मिळतात ज्या दिवशी या बातम्या वर्तमान पत्रात येणे बंध होईल. त्यावेळी खरा महिला दिन मी साजरा करेन. असे मनोगतातून त्यानी व्यक्त केले. तर रिटा खारकर यांनी महिलांना सांगितले की स्ट्रॉंग रहा आपल्या निश्चयावर ठाम राहा कधीही काहीही संकट आली तर नक्की मला कॉल करा ही लेडी टायगर तुमच्या बरोबर आहे असे त्यांनी महिलांना आश्वासन दिले.
तसेच, खारघर पोलिस स्टेशनच्या पी आय विमल बिडवे यांनी महिलांना मार्गदर्शन करत म्हणाल्या प्रत्येक स्त्री ही एक हिरो आहे आपल्या क्षेत्रात यावेळेस त्यांनी महिलांसाठी सल्ला दिला जर तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करण्यास बाहेर पडत असाल तर सोन्याचे दागिने न घालता बाहेर पडावे स्वप्नपूर्ती या ठिकाणी होणाऱ्या चोरीचे प्रमाण हे वाढत चालले आहे व महिलांनी महिलांना मदत करावी असे देखील त्यांनी आव्हान या वेळेस केले.
सौ. निर्मला चक्रधर राजदेव शिवनेरी मिसळ हाऊस व भोजनाल यांच्या तर्फे जागतिक संकट कोव्हीडच्या आपत्ती काळात ज्या महिलांनी त्यांच्याद्वारे झालेली मानवता सेवा आणि गरजूंना केलेली मदत कार्य समाजासाठी एक आदर्श आहे त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान दहा महिलांना “आदर्श महिला” म्हणून कर्तृत्वाचा गौरव करून पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
“आदर्श महिला” सन्मानित 2021-
● आदरणीय विमल बिडवे (पी आय क्राईम खारघर)
● आदरणीय नेहाताई शिंदे (समाजसेविका आणि आजाद समाज पार्टी महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा)
● सौ. रिटा दिपक खारकर (पोलिस सहायता संघठन ऑल इंडिया नवी मुंबई अध्यक्ष)
● सौ. स्वाती जिकमडे (शिक्षिका)
● सौ. राजेश्वरी वाव्हळ (पोलीस नाईक)
● डॉक्टर प्रीती गावकर (मुंबई हॉस्पिटल)
● कु. रुपाली वाघमारे (संपादक- आजची उद्योग नगरी सा. वृत्तपत्र/हिंदू सम्राट-पत्रकार)
● सरला आव्हाड (पोलीस कॉन्स्टेबल)
● सुजाता पवार (पोलीस कॉन्स्टेबल)
● सौ. ज्योती सरवदे (अक्षर वेल ज्योती फाउंडेशन मॅनेजिंग ट्रस्टी खारघर)
तसेच या वेळी प्रिय सखींन साठी “खेळ पैठणीचा” घेण्यात आला. सर्व खेळ हे सोशल डिस्टन्सचे पालन करून खेळण्यात आले. यावेळी तीन विजेता महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. पहिली विजेता सौ. राणी सकट या ठरल्या पैठणीच्या मानकरी, तर दुसर्या विजेता सौ. अनिता अनिल टाव्हरे यांना मंगलमूर्ती ज्वेलर तर्फे देण्यात आली चांदीची फ्रेम, तर तिसर्या विजेता सौ. अपर्णा कदम यांना ग्लासेस किचन सेट व 5 किलो कांदे नेचर फ्रेश च्या सौ. जयश्री घुले यांच्या तर्फे देण्यात आले.






