मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पोलीस अनेकदा सोशल मीडियावरून जनजागृतीपर पोस्ट लिहित असतात. ते कधी सायबर गुह्यांविषयी तर कधी कोरोनाविषयक जागृतीपर संदेश देत असतात, तेही हटके पद्धतीने.
नेटिजन्सही मुंबई पोलिसांच्या पोस्टवर मोठय़ा प्रमाणात लाईक्स आणि प्रतिक्रिया देत असतात. आताही त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करताना अनोखी पोस्ट लिहिली आहे. पिझ्झा आणि अननस, बिर्याणी आणि वेलची, ऍवाकॅडो आणि चॉकलेट या अशा लोकांना न आवडणाऱया गोष्टींचे कॉम्बो केले आहे. त्यासोबतच हनुवटीवर मास्क लावलेला इसम फोटोत दिसत आहे. ‘एक वेळ इतर कोणतेही कॉम्बो चालू शकते, पण हनुवटीवर मास्क हे कॉम्बो धोकादायक ठरू शकते’, अशी टिप्पणी त्यावर करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टने नेटिजन्सला खूश केले आहे.
Any trip to Mumbai is incomplete without the essentials – a must do for every person who visits the city.#WearAMask pic.twitter.com/YnAbVecAfI
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 12, 2021
याआधीही पोलिसांनी सोशल मीडियावर क़ल्पकता दाखवत ‘अग्निपथ’ सिनेमातील डायलॉगद्वारे वारंवार हात धुण्याचा संदेश दिला होता. त्यांनी 45 सेकंदांची एक क्लिप शेअर केली होती. त्यात अमिताभ बच्चन यांना ऑनस्क्रीन आई रोहिणी हट्टंगडी जेवणापूर्वी हात धुण्यास सांगत होती. ‘क्या आपने कभी जानने की कोशिश की, कि माँ को क्या पसंद है’ अशी कॅप्शन पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिली होती. तसेच एकदा नागरिकांना सीट बेल्टचे महत्त्व पटवून देण्यासाटी मुंबई पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवरून चक्क कारमध्ये बसलेल्या मोनालिसाचा फोटो शेअर केला होता.
Did you spot the safest?
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 13, 2021
Great.
Now be the safest.#WearAMask #TakingOnCorona pic.twitter.com/B50qURo0NH






