माझं लग्न लावून द्या! तरुणाचे चक्क महिला पोलिसांनाच साकडे

शामली (उत्तर प्रदेश) – एखाद्या गुह्याची तक्रार द्यायची असेल तर आपण पोलीस ठाण्याची पायरी चढतो, परंतु उत्तर प्रदेशात अजब घटना समोर आली आहे. कमी उंचीमुळे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने हैराण झालेल्या एका तरुणाने चक्क महिला पोलीस ठाणे गाठले असून ‘मॅडम, माझं लग्न लावून द्या,’ अशी मागणी केली आहे.

शामलीच्या जनपत भागात मोहम्मद अजीम हा 26 वर्षांचा तरुण राहतो. त्याची उंची जेमतेम 2 फूट आहे. वर्गात त्याला उंचीवरून वारंवार चिडवले जायचे. त्यामुळे पाचवीतच त्याने शिक्षण सोडले. आता त्याने आपल्या भावासोबत कॉस्मेटिकचे दुकान उघडले आहे.

वयाच्या 21 व्या वर्षापासून लग्नासाठी त्याने मुलींचा शोध सुरू केलाय, मात्र गेल्या चार-पाच वर्षांत त्याच्या पदरी निराशाच पडली आहे. अजीमचे कुटुंबीयदेखील त्याच्या लग्नाबाबत चिंतेत आहेत. त्यामुळे हैराण झालेल्या अजीमने चक्क महिला पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली. अगदी एसडीएम आणि कोतवाल यांच्याकडे जाऊनही लग्न लावून देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here