ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले तरी दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. वाढदिवस, लग्न, हळदी समारंभांच्या पार्ट्यांनंतर आता डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे.
शुक्रवारी डोंबिवलीत किरण म्हात्रे या तरुणाने आपल्या बैलाचा रेतीबंदर येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. या वाढदिवसाला 50 जण उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोविडच्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळण्यात आले नव्हते तसेच कोणीही मास्क घातले नव्हते.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी साथरोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केला. असेच किरण म्हात्रेला या प्रकरणी अटक केली होती.






