नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद

nandurbar-collector-rajendra-bharude

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा शहरात नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण रुग्णांचे 80 टक्के कोविड-19 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाढीचा आलेख दर दिवसाला उंचावत असल्याने रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच या दोन्ही शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहे यांच्यामार्फत जास्तीत जास्त घरपोच पार्सल सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे. घरपोच सुविधांचे किचन वितरण कक्ष सायकांळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील आठवडे बाजार बंद राहतील.

कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here