वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रासाठी महामंडळाकडून नियमावली जाहीर

मुबई (प्रतिनिधी) – राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

शुक्रवारी राज्यात १५,८१७ रुग्ण वाढले आहेत तर ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत शुक्रवारी गेल्या ६ महिन्यातली मोठी रुग्णवाढ झाली. मुंबईत शहरात १६४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.


निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी महत्वाच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. चित्रीकरण करताना विशेष काळजी घेवूनच चित्रीकरण करावे, असं महामंडळानं म्हटलं आहे. खबरदारी घेतली तरच शूटिंग सुरळीत सुरु राहणार आहे. आपले दुर्लक्ष वा हलगर्जीपणा सरकारला शूटिंग बंदी आणायला प्रवृत्त करेल, असं देखील महामंडळानं म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here