बॉलीवूडमधील कोरोनाचा शिरकाव सुरूच; तारा सुतारीयाला कोरोनाची लागण

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – संपूर्ण देशाला कोरोनाने विळखा घातला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातच सामान्य नागरिकांपासून ते बॉलीवूडकरांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज बाजपायी नंतर आता तारा सुतारीयाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ताराचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

नुकतीच तारा हिने आपला आगामी चित्रपट तडपचे शुटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये तारासह मुख्य भुमिकेत आहान शेट्टी सुद्धा दिसून येणार आहे. हा चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here