अक्कलकोट तालुक्यातील एकरुख उपसा जलसिंचन योजनेसाठी 35कोटी रुपयांचा निधी मंजुर – सिद्धाराम म्हेत्रे

अक्कलकोट-तडमुड – अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या एकरुख उपसा जल सिंचन योजने साठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने अक्कलकोट तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या एकरूख उपसा योजने साठी 35 कोटी रुपयांच्या निधीची मागणी अक्कलकोट तालुक्याचे नेते आणि गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी राज्याजे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मागणीनुसार जलसंपदामंत्र्यांनी एकरुखसाठी 35 कोटीची निधी उपलब्ध करून दिले आहे.

अक्कलकोट तालुक्यात हरित क्रांती घडवण्याचं एक स्वप्न उराशी बाळगून गेल्या 22 वर्षापासून संघर्ष करून उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणण्यासाठी अंतिम टप्प्यात असलेल्या कामास आणखी गती मिळावा म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री मा जयंत पाटील यांच्याकडे मा गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे काही दिवसापूर्वी निधींची मागणी केल्याने कालच्या बजेट अधिवेशनात एकरूख उपसा सिंचन योजनेसाठी 35 कोटींची निधी उपलब्ध करून दिल्याबदल महाविकास आघाडी सरकारचे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांचे जाहीर आभार अक्कलकोट शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबु यांनी मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here