आयकर भवनात प्रतिमा अनावरणासह सेवानिवृत्त झालेल्या महिला यांचा जाहीर सत्कार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – शुक्रवार दिनांक १२/३/२०२१रोजी दुपारी ०२-००वाजता आयकर भवन मध्ये आयटी सेवा यांना दान म्हणून दिलेली भ बुध्द मुर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमाचे अनावरण तसेच आयकरमधून सेवानिवृत्त झालेल्या महिला यांचा जाहीर सत्कार असा गोड सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित आयटी सेवा चे पदाधिकारी लोकधिकार समितीचे पदाधिकारी आयटी एफ ई यनियनचे पदाधिकारीआणिआयकर स्पोर्ट्स चे पदाधिकारी यांच्या उपस्थितत आलेले मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद भिमराव यशवंतराव आंबेडकर आद सुनील तांबूसकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलित करून भ बुध्द मुर्तीची प्रति स्थापना सत्कार करण्यात आला आयकर भवनमधील तमाम कर्मचारी यांनी या कार्यक्रमांस येऊन आपला बहुमुल्य वेळ देऊन शोभा आणली त्या बद्दल आयटी सेवा यांच्या विद्यमाने आभार मानण्यात आले.income-tax-mumbai

आयटी सेवाचे पदाधिकारी अध्यक्ष आद रामटेके, जनबंधू, ननावरे, सुरेश कांबळे, संजय कांबळे, करपे प्रदिप, संजय शिन्दे, आयकर केअरटेकर शिवदास जाधव आणि तमाम आयकर कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here