आ.अशोक पवारांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी; कैलास सोनवणे यांच्या शुभेच्छानंतर चर्चेला उधाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक व बाबूराव पाचर्णे यांची सावली समजले जाणारे कैलास सोनवणे यांनी शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार अध्यक्ष सार्वजनीक उपक्रम समिती यांचे गुणगान गात पवारांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा शुभेच्छा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

कोरेगाव-भीमा नवनिर्वाचित सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची भेट घेतली. यावेळी बाबूराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक कैलास सोनवणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांच्यासह कोरेगाव भिमाचे सरपंच अमोल गव्हाणे,ग्राम पं.सदस्य केशव फडतरे,मा.ग्रा.प.सदस्य अशोक गव्हाणे,रावसाहेब फडतरे,मा.उपसरपंच गणेश गव्हाणे, अरविंद गव्हाणे, विक्रम दौंडकर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.kailash-sonawane-shirirur

यावेळी सर्वाचा वतीने आमदार अशोक पवार यांचा सन्मान केला तर अशोक पवार यांनी देखील सर्व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदारांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान केला. यावेळी सर्वानी कोरेगाव भिमाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. कोरेगाव-भीमा येथील रस्ते, ड्रेनेज, आरोग्य यासारख्या कामांना प्राधान्य देऊन ही कामे तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.

याप्रसंगी बोलताना कैलास सोनवणे यांनी अशोक पवार यांचे गुणगान गात अशोक पवार हेच कोरेगाव-भीमा चा विकास करू शकतात असे सांगितले तर जो कोणीही माणुस येईल त्याची कामे करत आतिशय चांगल्या पध्दतीने तालुक्याचा विकास सुरु आहे. कार्यसम्राट आमदार अशोक पवारांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी अश्या जुने सहकारी म्हणून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here