औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय माने) – औरंगाबाद रोड वर नाना ढाबा जवळ मंगळवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास एका दुचाकी चालकाला एका अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सचिन वाल्मिक मिसाल असे असून तो केवळ २८ वर्षांचा होता. नाना ढाबाच्या जवळून तो आपल्या घरी जात असताना एका अज्ञात वाहनांची त्याला धडक लागली ज्यात सचिन गंभीर जखमी झाला होता. परिसरातील माणसांनकडून सचिनला वैजापूर येथील उप- जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
रुग्णालयात पहोचताच सचिनने अखेरचा श्वास घेत त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांकडून त्या अज्ञात गाडी आणि चालकाचा शोध सुरु असून तपास सुरु आहे.






