‘तारक मेहता का…’ मधील मिसेस सोढीने शेअर केले बेबी बंपचे फोटो

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये मिसेस सोढीची भूमिका करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने सोशल मीडियावर बेबी बंपसह फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र हे फोटो आताचे नाही तर 2013 मधील असल्याचे समोर आले आहे.

जेनिफर मिस्त्री हिने शेअर केलेले फोटो 2013 मधील असून त्यावेळी ती पहिल्यांदा आई झाली होती. या दरम्यान तिने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून ब्रेकही घेतला होता. जवळपास तीन वर्ष ती या मालिकेत दिसली नव्हती. अखेर 2016 ला तिने या मालिकेमध्ये पुनरागमन केले आणि अजूनही ती या मालिकेत दिसत आहे.

जेनिफर मिस्त्री हिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 2013 मधील हा काळ आठवत तिने फोटोंसह कॅप्शनही दिले आहे. हे फोटो पाहून मला 2013 मधील त्या दिवसांची आठवण येते, त्यावेळी मी गर्भवती होते. त्यावेळी हे फोटो मी शेअर केले नव्हते, म्हणून आता करत आहे. मी विचारही करू शकत नाही की मी कशा पद्धतीने माझे वजन आणि स्थुलपणा कमी केला होता, असे कॅप्शन तिने या फोटोंसह दिले आहे.

दरम्यान जेनिफरने टीव्हीसह मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. ‘हल्ला बोल’, ‘लक बाय चान्स’ आणि अक्षर कुमार स्टारर ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटामध्येही ती दिसली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here